पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल
लातूर : दि. ८ एप्रिल “मी वाळू वाला आहे” असे सांगत पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वाळू माफियांविरुद्ध स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हि घटना ४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पत्रकार नेताजी जाधव हे अहिल्यादेवी होळकर चौक ते गरुड चौकाकडे जात असताना डीमार्टजवळ रस्त्याच्या कडेला स्कुटीवर थांबलेले दोन इसम अचानक त्यांच्या न्यूज चॅनलच्या वाहनासमोर आले दरम्यान अपघाताची कोणतीही घटना घडली नसतानाही संबंधित दोघांनी “तू पत्रकार आहेस कि बे? तुला गाडी चालवायचं कळत नाही का?” असे म्हणत अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराबाबत ५ एप्रिल रोजी पत्रकार नेताजी जाधव यांनी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 234/2025 अन्वये भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कलम 296, 352, 351(2), 351(3), 3(5) व मोटार वाहन कायदा 1998 मधील कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे करीत असून, आज दि ८ एप्रिल रोजी आरोपींना अटक करून उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या समोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.
या प्रकारा नंतर लातूर जिल्ह्यातील सुमारे ५० पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षकांना भेटले. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सुधाकर बावकर, दिलीप सागर, संतोष पाटील यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाई करत आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल केल्याने पत्रकारांच्या शिष्टमंडळातील सितम सोनवणे, लहू शिंदे, निशांत भद्रेश्वर, नितीन बनसोडे, विष्णू आष्टीकर, लिंबराज पन्हाळकर, खंडेराव देडे, हरिश्चंद्र जाधव, हारून सय्यद, सालार शेख, संदीप भोसले, सुनील कांबळे, अमोल घायाळ, संतोष सोनवणे, आनंद दणके, अजय घोडके, हारून मोमीन, के वाय पटवेकर, संजय गुच्चे, प्रकाश कंकाळ, धनराज वाघमारे, विशाल सूर्यवंशी, विकी पवार, अहिल्या कसपटे, दिनेश गिरी, श्रीकांत चलवाड आदी पत्रकारांनी आभार मानले आहेत.
0 Comments