Latest News

6/recent/ticker-posts

क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त मुरुड येथे भव्य कार्यक्रम; फुले चौक व अभ्यासिकेस दांपत्याचे नामकरण

क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त मुरुड येथे कार्यक्रम; फुले चौक व अभ्यासिकेस दांपत्याचे नामकरण

मुरुड : ता. लातूर - 11 एप्रिल 2025 आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त मुरुड (ता. लातूर) येथे समस्त माळी समाजाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या औचित्याने माळी गल्ली, मुरुड येथे "क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले" चौक उभारण्यात आला असून, मुरुड ग्रामपंचायत अंतर्गत चालणाऱ्या अभ्यासिकेस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या थोर दांपत्याचे नाव देण्यात आले.

कार्यक्रमास डी.डी.एन.एस.एफ.ए. साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप दादा नाडे, मुरुडचे उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक, दूधगंगा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बी. एन. डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य अनंत कणसे, महेश कणसे, सुरज सूर्यवंशी, माजी उपसरपंच आकाश कणसे, प्राध्यापक अंकुश नाडे, लक्ष्मीकांत तवले, अमर मोरे, गजानन साबळे, इंजी. शिवलिंग चौधरी, दीपक पटाडे, पप्पू सुरवसे, विजयानंद गायकवाड, भालचंद्र धावारे, सतीश मिसाळ, सौ. उषा शिंदे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य उलगडले. दीन-दलित, गोर-गरीब, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त महिलांना आधार देणाऱ्या फुले दांपत्याच्या कार्याचा गौरव करण्यात आला. "शेतकऱ्याचा आसूड" या पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावरही भाष्य करण्यात आले. त्यांच्या 65 वर्षांच्या कार्यातील उल्लेखनीय घटनांचा सविस्तर आढावा घेतला गेला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू माळी, दत्तात्रय गोरे, अशोक माळी, संतराम ढोले, सावता माळी, विशाल सरवदे, मोहन माळी, बाजीराव माळी, महेश माळी, शशिकांत माळी, कल्याण माळी, भारत माळी, अच्युत माळी, राजाभाऊ माळी, दीपक गोरे, विलास माळी, बालाजी माळी, राजन माळी, अमोल माळी, अनिल माळी, दिनेश माळी, संजय माळी, सतीश माळी, जीवन माळी, आश्रप्पा माळी, पवन माळी, चैतन्य माळी, विनय माळी आदिने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. कमलाकर माळी यांनी केले.

Post a Comment

0 Comments