लातूरात निमंत्रितांच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा
दिलीपराव देशमुख अमृत महोत्सव व्हॉलीबॉल चषक
लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धा की्रडा संकुलातील व्हॉलीबॉल मैदानावर होणार असून वरिष्ठ गटाच्या नुकत्याच झालेलया राज्यस्पर्धेतील पुरूष व महिलांचे पहिले आठ संघ यात सहभागी होणार आहेत. पुरूष व महिला गटात प्रत्येकी 96 असे एकूण 192 खेळाडू आपले कौशल्य सादर करणार आहेत. महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते मोईज शेख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यात स्पर्धेची रूपरेषा ठरविण्यात आली असून विविध समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. यावेळी विभागीय सचिव दत्ताभाऊ सोमवंशी, जिल्हा संघटनेचे महेश पाळणे, सोनु डगवाले, मुजीब सय्य्द, नागेश जोगदंड, जेष्ठ पंच विक्रम पाटील, ॲङ पवन पाळणे, आझम पठाण, नंदकुमार भोसले, डॉ. निलेश पौळ, कृष्णदेव पोतदार, शहाबाज पठाण, विजय सोनवणे, साजिद पठाण, गणेश कोल्हे, गब्बर शेख, दैवशाला जगदाळे, विठ्ठल कवरे, प्रल्हाद सोमवंशी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तथा खेळाडूंची उपस्थिती होती.
75 हजार रूपये रोख प्रथम पारितोषिक
या स्पर्धेतील पुरूष व महिला गटातील विजेत्या संघाला 75 हजार रूपये रोख व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. द्वितीय संघास 51 हजार रूपये रोख व चषक तर तृतीय येणाऱ्या संघास 31 हजार रूपये रोख व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. यासह उत्कृष्ट अटॅकर, उत्कृष्ट लिफ्टर, उत्कृष्ट लिबीरो व मॅन ऑफ दि टुर्नामेंट अशा खेळाडूंनाही रोख पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या संघाना एक साइडचा प्रवास भत्ताही देण्यात येणार आहे.
प्रकाशझोतात स्पर्धा
या स्पर्धेसाठी क्रीडा संकुलातील व्हॉलीबॉल् मैदानावर दोन सुसज्ज मैदान तयार करण्यात येणार असून या स्पर्धा प्रकाशझोतात होणार आहेत. लिग कम नॉकआऊट पध्दतीने हे सामने पुरूष व महिला गटात होणार असून प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोयही करण्यात येणार आहे. एकंदरीत या स्पर्धेमुळे लातूरच्या क्रीडा रसिकांना व्हॉलीबॉल् स्पर्धांची मेजवानी मिळणार असून राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ पहावयास मिळणार आहे.
0 Comments