नळेगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी अनिल चव्हाण यांची निवड
कार्याध्यक्षपदी उमाकांत किडीले तर प्रधान सचिवपदी प्रा. संतोष हुडगे तर उपाध्यक्षपदी शरद हुडगे व वहाब जागीरदार यांची निवड
नळेगाव : जि. प. प्रशाला नळेगाव येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कार्यकारिणी 2025 च्या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती नळेगाव शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह तथा कार्यालयीन व्यवस्थापन विभाग प्रमुख उत्तरेश्वर गुरुनाथ बिराजदार तसेच लातूर शहर कार्याध्यक्ष डॉ. गणेश सुधाकरराव गोमारे व प्रा. डॉ. दशरथ भिसे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. उपस्थित असलेल्या निरीक्षकांनी सर्वांशी विचार विनिमय तथा सविस्तर चर्चा करून करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नळेगाव शाखेच्या अध्यक्षपदी नळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल विश्वनाथराव चव्हाण यांची अध्यक्ष म्हणून तसेच शरद गंगाधरराव हुडगे व वहाब नजीबसाहब जागीरदार यांची उपाध्यक्ष म्हणून तसेच कार्याध्यक्षपदी उमाकांत भिमराव किडीले यांची तर प्रधान सचिव पदी शिवजागृती महाविद्यालय नळेगाव येथील प्रा. संतोष व्यंकटी हुडगे यांची निवड करण्यात आली.इतर कार्यकारिणी सदस्यांमध्ये बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाहपदी भगीरथ गोविंदराव रेड्डी, विविध उपक्रम विभाग कार्यवाहपदी संदिपान मारुतीराव कोरे, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाहपदी चेतन विश्वनाथराव चव्हाण, महिला सहभाग विभाग कार्यवाहपदी संगीता रघुनाथराव कत्ते, युवा सहभाग विभाग कार्यवाहपदी अमोल अनंतराव तोंडारे व मयूर मनोहर कांबळे यांची तर जोडीदाराची विवेकी निवड विभाग कार्यवाह पदी प्रा. लंझिले प्रदीप मारुती, जात पंचायत मुठमाती अभियान विभाग कार्यवाहपदी अजगर मजकुरी,आंतरजातीय आंतर धर्म सत्यशोधकी विवाह विभाग कार्यवाहपदी प्रा. शिरूरे ऋषिकेश वैजनाथ, प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग कार्यवाहपदी श्री देविदास बाबुराव माने, विवेक जागर प्रकाशन व वितरण विभाग कार्यवाहपदी सुधाकर बापूराव भालेकर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग कार्यवाहक म्हणून ज्ञानोबा व्यंकटराव येणगे, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग कार्यवाह पदी डॉ. अरुण बाबुराव भालेकर तसेच विज्ञान बोधवाहिनी विभाग कार्यवाहपदी प्रभावती गणपत डोंगरे, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग कार्यवाहपदी सोपान ज्ञानोबा भालेकर, सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग कार्यवाह पदी अशोक माधवराव बिराजदार व सहकार्यवाहपदी सुनील रामचंद्र भोसले, राष्ट्रीय समन्वय विभाग कार्यवाहपदी नागनाथ कल्याप्पा स्वामी, निधी व्यवस्थापन विभाग कार्यवाहपदी अजित राजेंद्र शिरूरे, कायदेविषयक व्यवस्थापन विभाग कार्यवाहपदी ॲड. केशव माधवराव खांडेकर यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले उत्तरेश्वर गुरुनाथ बिराजदार, डॉ. गणेश सुधाकरराव गोमारे व प्रा. डॉ. दशरथ भिसे यांनी सर्व नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या उत्तरेश्वर बिराजदार यांनी शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे राहिलेले अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन तथा विवेकाचा जागर करून बलशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी नळेगाव शाखेतील सर्व कार्यकारिणी जोमाने कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी जिल्हा परिषद प्रशाला नळेगावचे मुख्याध्यापक स्वामी नागनाथ, कै. नरसिंगराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक चेतन चव्हाण, शरद हुडगे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत भोजने, पत्की बंडोपंत, मयूर कांबळे, पत्रकार अजगर मजकुरी उपस्थित होते. नळेगाव शाखेच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नूतन कार्याध्यक्ष उमाकांत किडीले यांनी आभार व्यक्त केले व या कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments