Latest News

6/recent/ticker-posts

आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने अरुणकुमार मेहत्रे यांचा गौरव

आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने अरुणकुमार मेहत्रे यांचा गौरव

पनवेल : येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई रायगड जिल्हा यांच्या वतीने पनवेल तालुका प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सन्मान सोहळा - 2025 उत्साहात संपन्न झाला.


या सोहळ्यात लातूरचे भूमिपुत्र व दै. लोकमतचे नवी मुंबई येथील वृत्तसंकलक अरुणकुमार मेहत्रे यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेच्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


झी टीव्हीच्या वृत्तनिवेदिका मनश्री पाठक यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला. अरुणकुमार मेहत्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments