Latest News

6/recent/ticker-posts

वक्फ सुधार विधेयक रद्द करण्यासाठी लातूरमध्ये तीव्र निदर्शने

वक्फ सुधार विधेयक रद्द करण्यासाठी लातूरमध्ये तीव्र निदर्शने

लातूर : दि. ०४ एप्रिल २०२५ – आज नमाज-ए-जुमा (शुक्रवार) नंतर लातूर येथील मरकज मशीद (गंज गोलाई) परिसरात वक्फ सुधार विधेयक - २०२५ च्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या वक्फ मालमत्तेच्या संभाव्य नासाडीविरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या निदर्शनात केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “वक्फ अमेंडमेंट बिल रद्द करो”, “मुस्लिम समाजावर अन्याय बंद करो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या आंदोलनाचं नेतृत्व एम.आय.एम. पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष  Adv. मोहम्मदअली शेख यांनी केलं. ते बोलताना म्हणाले की, सरकारने सादर केलेल्या वक्फ विधेयकामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांवर गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यांनी या विधेयकाला संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचा भंग मानत तात्काळ हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली. या वेळी मुजीब हमदुले, अहमद ख़ान, जावेद पटेल, गौस मणियार, समीर तांबोळी, सलीम क़ाज़ी साहेब, सय्यद इमरान साहेब, सय्यद परवेज़, जुनैद तांबोळी, सय्यद इनाम, अनवर बागवान, शाहदुल बागवान, तबरेज तांबोळी सह या निदर्शनात लातूर शहर व परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments