Latest News

6/recent/ticker-posts

बेवारस वाहने घेऊन जाण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन

बेवारस वाहने घेऊन जाण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन

लातूर : अनेक महिन्यापासून विविध गुन्ह्यांत जप्त व बेवारस दुचाकी आणि चारचाकी वाहने लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली आहेत. सदर वाहने मूळ मालकास परत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसांत ही कार्यवाही करण्यात येणार असून नागरिकांनी आपली वाहने घेऊन जावीत असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.


चाकुर, कासारशिरशी, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर. मुरुड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक महिन्यापासून विविध गुन्ह्यांतील बेवारस वाहने पडून असून दुचाकी व चारचाकी  वाहनांचे चेसीस क्रंमाक व इंजीन क्रमांक याची तपासणी करून वाहन मूळ मालकाला परत देण्यात येणार आहे. वाहनाच्या मालकांनी स्वतः वाहनाचे कागदपत्रासह  उपस्‍थित राहून येत्या 15 दिवसांच्या आत योग्य ती कायदेशीर बाबींची पूर्तता करून वाहन घेऊन जावे, उर्वरित वाहना बद्दल कोणाचीही मालकी सिद्ध नाही झाल्यास कुणाचीही तक्रार नाही असे गृहीत धरून पोलिस अधिनियम 1951 चे कलम 87 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 458 प्रमाणे बेवारस वाहनांची जाहीर लिलाव प्रकिया राबविण्यात येणार आहे.

सदर वाहना संदर्भातील वाहन क्रमांक व चेसीज, इंजिन क्रमांकाची माहिती लातूर पोलीस दलाच्या वेबसाईट https://laturpolice.gov.in/ वर प्रसारित करण्यात आली असून संबंधित पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डवर वाहनाच्या माहितीची लिस्ट लावण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments