कश्मीर येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्याचा लातूरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने निषेध
शहीद अहमद खान कृती समितीने केले कॅण्डल लावून श्रद्धांजली अर्पण
लातूर : दिनांक 23 एप्रिल जम्मू कश्मीर परिसरातील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकावरील भ्याड हल्ल्याचा लातूरातील व्यापारी संकुल असलेल्या गंजगोलाई येथे शहीद अहमद खान पठाण कृती समिती यांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अमृतात्म्यांना आज दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता कॅण्डल लावून श्रद्धांजली अर्पण करत आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष सय्यद सरफराज, एस डी पी आय चे सलीम काझी, सय्यद जहीर, रफिक कुरेशी, माजीद खान, हाफिज नासिर, समीर खान, नासिर जागिरदार, भीम आर्मीचे अक्षय धावारे, आदित्य कांबळे, माय फाउंडेशनचे अन्वर शेख,सादिक शेख, तोसिफ शेख, इस्माईल शेख, हक्कानी शेख, कासिम शेख, सादिक शेख, शादुल शेख, मोहम्मद शेख यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
0 Comments