अशिहारा कराटे इंडिया आयोजित पंच प्रशिक्षण शिबिर आणि डॅन ग्रेडिंग कार्यक्रम डोंबिवलीत उत्साहात सुरू
डोंबिवलीतील अर्बन आखाडा येथे सुरू असलेल्या अशिहारा कराटे पंच प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षकांना मार्गदर्शन करताना कैचो हुसैन नारकर.
शिबिरात सहभागी झालेल्या प्रमुख प्रशिक्षकांमध्ये उत्तर प्रदेश येथील आलोक कुमार, आर्या, अजय चौरसिया, तामिळनाडूमधील गोपाळ कृष्णन, पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल येथील अनिल खाल्खो तसेच मुंबईतील दयाशंकर पाल, कुणाल पाल, दक्ष पाल, दिशा पाल, नयना पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय रत्नागिरी येथून शिवानंद खेडेकर, स्वप्नाली पवार, मंदार साळवी, प्रणित सावंत, पुण्याहून जयदेव म्हमाणे, अशपाक तांबोळी, आदित्य बुक्की, शंकर साबळे तसेच देशभरातील इतर राज्यांतील प्रशिक्षक या शिबिरात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाम श्रीकुमार, इशा भगत, पार्थ भडसावळे, प्रतिमेश मराठे आदी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. शिबिरादरम्यान कराटेतील विविध तांत्रिक कौशल्ये, डॅन ग्रेडिंग प्रक्रियेची माहिती व शारीरिक क्षमतेचा विकास यावर भर दिला जात आहे.
0 Comments