भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ; विद्यार्थ्यांकडून वाचनातून अभिव्यक्त आदर
लातूर : दि. १४ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडारवाडा- बुद्रुकवाडी ता. निलंगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
“पुस्तकाशी मैत्री असणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन हे पुस्तक वाचूनच होईल,” या उद्देशाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी एक तास एकाग्रचित्तेने पाठ्यपुस्तकांचे वाचन करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली अर्पण केली. या वेळी शाळेचे शिक्षक सिराज तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.
0 Comments