सामाजिक समता सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान
लातूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंर्तगत जिल्हाभरात सुरु असुन याअंतर्गत रविवारी लातूर तालुक्यातील आर्वी येथे समाज कल्याण कार्यालय व शारदासदन अनु. जाती आश्रमशाळा यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
आर्वी येथील आश्रमशाळा परिसर व गावभागात हे स्वच्छता अभियान झाले. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा एकत्रीत करण्यात आला, परिसरातील रस्त्यांची साफसफाई व शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला. हे अभियान समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले असुन स्वच्छता अभियानात समाज कल्याण विभागातील सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे, मुख्याद्यापक विठ्ठल मुचवाड, लक्ष्मण उपाडे, उमेश जाधव, लक्ष्मी जकाते, शिवनंदा कदम, श्याम भोसले, सुरेश कांबळे, प्रवीण मोरे, प्रदीप समुद्रे, श्रीकांत उंबरे, विनोद आडगळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सदर सामाजिक सप्ताहाला ८ एप्रिल पासुन सुरुवात झाली असुन जिल्हयातील दिव्यांग शाळा, अनुसुचित जातींच्या आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या असुन सप्ताहाची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनी होणार आहे.
0 Comments