Latest News

6/recent/ticker-posts

जागतिक मास रेसलिंग स्पर्धेसाठी जयदेव म्हमाणे यांची भारतीय संघात निवड

जागतिक मास रेसलिंग स्पर्धेसाठी जयदेव म्हमाणे यांची भारतीय संघात निवड


पुणे : { प्रतिनिधी/राजकुमार भंडारी } मास रेसलिंग या आंतरराष्ट्रीय खेळाच्या जागतिक स्पर्धेसाठी भारताच्या संघात पिंपरी येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाणे यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा २१ ते २७ एप्रिल या कालावधीत त्सकाल्टुबो, जॉर्जिया येथे होणार आहे. या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात एकूण सहा खेळाडूंचा समावेश असून, दोन प्रशिक्षक, एक पंच आणि एक प्रतिनिधी मंडळ प्रमुख असे एकूण दहा सदस्य भारतीय संघात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे जयदेव म्हमाणे हे केवळ खेळाडूच नव्हे, तर प्रशिक्षक आणि पंच म्हणूनही काम पाहत आहेत.

त्यांनी यापूर्वीही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या कौशल्याने आणि अनुभवाने भारतीय संघाला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. ही स्पर्धा जॉर्जिया मास रेसलिंग फेडरेशन आणि जॉर्जिया क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. भारताकडून निवड झाल्यामुळे जयदेव म्हमाणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments