लातूर जिल्हा वकील मंडळाच्या अध्यक्षपदी अँड योगेश जगताप विजयी
लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीत पाच पॅनलमध्ये चूरशीची लढत झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. योगेश जगताप , उपाध्यक्ष ॲड. संजय जगदाळे महिला उपाध्यक्ष पदी सलग दुसऱ्यांदा अँड मनीषा दिवे पाटील विजयी झाले, तर सचिवपदी ॲड. गणेश गोजमगुंडे निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. १६३१ पैकी १३२२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. लातूर जिल्हा वकील मंडळाच्या कार्यकारिणीसाठी बुधवारी निवडणूक झाली.
त्यात सहसचिव अँड निलेश मुचाटे महिला सहसचिव ॲड. अभिलाषा गवारे ,ग्रंथालय सचिव ॲड. प्रणव रायचूरकर,कोषाध्यक्ष ॲड. गणेश कांबळे हे विजयी झाले आहेत. बुधवार सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत मतदान झाले होते. मतमोजणी पहाटे साधारण ५.३० वाजेपर्यंत चालली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड शोभा गोमारे दुड्डे, अँड महेश खणगे, रुक्मिणी भोसले तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड दौलत दाताळ,अँड किरण चिंते ,अँड नयना देवताळकर ,ॲड. सुमेधा शिंदे , अँड युवराज इंगोले, अँड पवन पाळणे, अँड सर्फराज मणियार, अँड कोमल राठोड यांनी कामकाज पाहिले. त्यांना कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मसलगे, सुशील सुरवसे, विष्णू जाधव यांनी साहाय्य केले तर सर्व नूतन पदाधिकारी यांचा मावळत्या कार्यकारिणीने सत्कार करून स्वागत केले आहे.
0 Comments