शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी केली संवेदना दिव्यांग प्रकल्पाची स्वच्छता
सामूहिक विकास योजनेअंतर्गत विस्तारित केंद्रावर "स्वच्छता हीच सेवा" शिबिराचे आयोजन
लातूर : दिनांक 01 एप्रिल शहरातील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सामूहिक विकास योजनेअंतर्गत चालणाऱ्या विस्तार केंद्रावर एनएसएस अंतर्गत "स्वच्छता हीच सेवा" या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरा अंतर्गत संवेदना दिव्यांग प्रकल्प हरंगुळ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
या शिबिरासाठी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या एकूण साठ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली होती. हरंगुळ येथील संवेदना दिव्यांग प्रकल्पात सुरू असलेल्या विविध योजनेची माहिती घेताना कंपोस्ट खत प्रकल्पाची प्रक्रिया, बहु विकलांग शाळेस भेट, प्रकल्पांतर्गत ची सर्व विभागाचे विविध थेरपी कक्षांची माहिती, संवेदना दिव्यांग आयटीआय प्रशिक्षणातील इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, कोपा ड्रेस मेकिंग यांच्या सेट ची ही माहिती घेतली व दिव्यांग प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला अशी माहिती शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा .एस डी राठोड यांनी आज दिनांक 01 एप्रिल रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य एस डी राठोड, अधिव्याख्याता डॉक्टर श्रीमती यादव, प्राध्यापक सौ चिंचोलीकर, सौ कदम, श्री बगरे आणि सौ कांबळे यांची उपस्थिती होती.
0 Comments