Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय मुदगड येथे पालक मेळावा

महाराष्ट्र विद्यालय मुदगड येथे पालक मेळावा


निलंगा : दि. 24 मार्च 2025 – महाराष्ट्र विद्यालय, मुदगड (ता. निलंगा) येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय आर. के. पाचंगे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी दयानंद मुळे, चेअरमन बेदरे गुरुजी, पांचाळ गुरुजी, प्रशांत इंगळे, मोहिते, मनाळे (उपसरपंच), तसेच हराळे एस.पी. आणि सेवानिवृत्त सहशिक्षक टेकाळे व्ही.बी. उपस्थित होते.

या मेळाव्यास विद्यार्थ्यांचे पालक आणि माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माने एम. व्ही. यांनी केले, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून गायकवाड एन. यू. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी टेकाळे व्ही.बी. यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री. आर. के. पाचंगे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणामध्ये झालेल्या बदलांविषयी माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पालकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल मार्गदर्शन केले. पुढील वर्षासाठी इयत्ता दहावीचा वार्षिक अभ्यासक्रम आराखडाही सविस्तर सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी पी. ए. यांनी केले. तर, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक माळी एस. एस., बोळे आर., जावळे ओ. व्ही., इंगळे बी. व्ही., लामतुरे एस. आर., कोळी व्ही. आर. आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पालकांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.

Post a Comment

0 Comments