आशिहारा कराटे स्पर्धेत ११ खेळाडूंना ब्लॅक बेल्ट, स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक आकर्षणाचा केंद्रबिंदू
मुंबई: आशिहारा कराटे इंटरनॅशनलच्या वार्षिक स्पर्धेचे आयोजन लायन्स क्लब ऑफ मुलुंड मैदान येथे मुख्य प्रशिक्षक दयाशंकर पाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अंतिम फेरीत कीर्ती ठाकुर, दिशा चिपटे, विहान खरे, मानसी दांडेकर, चैतन्य चिपटे, तन्मय ऐरम, भावेश तरे, श्रीनिधी धनवडे, विनीत झिंगाडे, स्वामी शिरोडकर आणि रजनीश कनोजिया यांची ब्लॅक बेल्टसाठी निवड झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वरिष्ठ समाजसेवी डॉ. बाबूलाल सिंह, युवा ब्रिगेड असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन सिंह, शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर यादव आणि संजय मिश्रा यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट व प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचे कौतुक केले.
यावेळी प्रा. सोनम केवट यांनी विविध योग मुद्रांचे तसेच लाठी चालवून स्वसंरक्षणाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये आनंद जाधव, नयना पाटील, विश्वास पाल, अभिषेक गुप्ता, आशीष पाल, अजीत यादव आणि दक्ष पाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments