Latest News

6/recent/ticker-posts

रमजान महिन्यात अतिक्रमण कारवाईला तात्पुरती स्थगिती द्यावी – संभाजी ब्रिगेड

रमजान महिन्यात अतिक्रमण कारवाईला तात्पुरती स्थगिती द्यावी – संभाजी ब्रिगेड


निलंगा :{ प्रतिनिधी/रहीम मणियार } पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील फळ व अन्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाडीवाल्यांवरील अतिक्रमण कारवाईला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. रमजान महिना हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात अनेक गरीब व लहान व्यापारी फळे व खाद्यपदार्थ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. निलंगा शहरात सर्व समाज एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करतो. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन निलंगा शहराने नेहमीच महाराष्ट्राला घडवले आहे.

या पार्श्वभूमीवर, नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेली अतिक्रमण कारवाई रमजान महिन्यात तात्पुरती स्थगित करण्यात यावी, जेणेकरून गरीब मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय सुरू ठेवता येईल. आम्ही कायमस्वरूपी अतिक्रमण कारवाई थांबवण्याची मागणी करत नाही, मात्र रमजानचा महिना लक्षात घेऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून काही काळासाठी ही कारवाई स्थगित करण्यात यावी, असे संभाजी ब्रिगेडचे मत आहे.

Post a Comment

0 Comments