Latest News

6/recent/ticker-posts

सार्वजनिक गुढी महोत्सव समितीच्या वतीने माझं लातूर परिवाराचा सन्मान

सार्वजनिक गुढी महोत्सव समितीच्या वतीने माझं लातूर परिवाराचा सन्मान


सतीश तांदळे


लातूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गुढी महोत्सव समितीच्या वतीने मराठवाड्यातील मानाची गुढी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गंजगोलाई येथील जगदंबादेवी मंदिरासमोर उभारण्यात आली. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या "माझं लातूर" परिवाराचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

गुढीपाडवा निमित्त सार्वजनिक गुढी महोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षी गंजगोलाई येथे गुढी उभारण्यात येते. याही वर्षी पाडवा आणि रमजान ईदचे औचित्य साधत समितीने एकतेची तिरंगा "निर्भया" गुढी उभारत निर्भय व्हा ११२ वर कॉल करा हा सामाजिक संदेश दिला. डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली याप्रसंगी माजी उप महापौर चंद्रकांत बिराजदार, नरसिंह घोणे, दिपक गंगणे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माझं लातूर परिवाराचा सन्मान करण्यात आला. शिरीष शेरखाने, डॉ सितम सोनवणे, उमेश कांबळे यांनी परिवाराच्या वतीने सन्मान स्वीकारला.

समितीने यावर्षी माझं लातूर परिवाराचा सन्मान करून आमची सामाजिक जबाबदारी वाढवली असून निस्वार्थ आणि प्रामाणिक समाज कार्याचा हा रथ तेवढ्याच ताकदीने प्रभावीपणे यापुढील काळातही ओढला जाईल याची ग्वाही माझं लातूर परिवाराच्या वतीने देण्यात आली. या सन्मानाबद्दल सार्वजनिक गुढी महोत्सव समितीचे आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments