Latest News

6/recent/ticker-posts

चांद पीर बाबा खाडगाव यात्रेत भुसणीच्या दिपक सगरेनी पटकावली एक किलो चांदीची गदा

चांद पीर बाबा खाडगाव यात्रेत भुसणीच्या दिपक सगरेनी पटकावली एक किलो चांदीची गदा


प्रदिप गोरे यांनी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, अलिम पठाण यांना चांदीचे कडे व प्रदिप काळे यांना चांदीचे ब्रासलेट; खाडगाव ग्रामपंचायतच्या 101 कुस्तीचा संकल्प पूर्ण


लातूर
: दि 03 मार्च खाडगाव येथील चांद पीर बाबा अवलिया दर्गा यात्रा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर काल 02 मार्च रोजी संपन्न झालेल्या कुस्ती मैदानात खाडगाव ग्रामपंचायत चे 101 कुस्त्यांचा संकल्प पूर्ण झाला असून या मैदानात दीपक सगरे यांनी एक किलो चांदीचा गदा तर प्रदिप गोरे यांनी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, अलिम पठाण यांनी पाव किलो चांदीचे कडे व फय्याज सय्यद यांनी आकरा तोळे चांदीचे ब्रेसलेट पटकावले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे सन 2025 सालातील ग्रामपंचायतच्या 101 कुस्त्यांचे मैदान यशस्वी पार पडले असून चार दिवशी चालणारी चांद पिर बाबा यात्रा ऊरूस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी यात्रेची सुरुवात संदलाने झाली तर दिनांक 28 फेब्रुवारी रोजीच्या शाहिद अजमेरी व शाहीन शबनम मुंबई यांच्या जंगी कव्वाली मुकाबल्याने यात्रा उरूसात चार चांद लागले आहे. याचबरोबर दिनांक 01 मार्च रोजी लंगर महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तर दिनांक 02 मार्च रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान व शोभेची दारू उडवून यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी सरपंच नेताजी देशमुख व माजी सरपंच विष्णुपंत साठे यांनी प्रमुख भूमिका बजावत गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांना सोबत घेऊन ही यात्रा यशस्वी पार पाडली आहे.

कुस्तीच्या जंगी मैदानासाठी पहिले बक्षीस ज्ञानेश्वर रामचंद्र कातळे यांच्या वतीने एक किलो चांदीचा गदा वर्ष 23 वे, दुसरे बक्षीस हरिभाऊ वैजनाथ कोटलवार यांच्या वतीने पाच ग्रॅम सोन्याचे अंगठी, तिसरे बक्षीस योगेश पाटील यांच्या वतीने कैलासवासी व्यंकटराव सदाशिव पाटील यांच्या स्मरणार्थ पाव किलो चांदीचे कडे व ढाल, चौथे बक्षीस प्रदीप प्रभू जाधव यांच्या वतीने स्वर्गीय प्रभू विश्वनाथ जाधव यांच्या स्मरणार्थ 11 तोळे चांदीचे कडे व स्मृतिचिन्ह तसेच चांदीचे आकरा तोळे  ब्रासलेट ठेवण्यात आले होते त्याची मल्लांनी लूट केली आहे.

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष हनुमंतराव देशमुख, सरपंच एडवोकेट नेताजी देशमुख, उपसरपंच अभिनंद जाधव, सदस्य जिब्राहील पटेल, माजी उपसरपंच विष्णुपंत साठे, बालाजी साळुंखे, शिखूर साब मुजावर, इसाक पटेल, बाबुभाई मुजावर, शशिकांत देशमुख, पांडुरंग पाटील, नेताजी कांबळे, गौस सय्यद, बापूसाहेब मगर यांची उपस्थिती होती. मोसिन आतार बार्शी यांनी आपल्या कणखर भाषाशैलीत कुस्तीचे निवेदन केले तर कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे प्रमुख मैनोद्दिन शेख पहिलवान खाडगाव यांनी कुस्त्यांचे मैदान यशस्वी पार पाडले आहे.

Post a Comment

0 Comments