राज्यस्तरीय शालेय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंचा निटूर पोलीस चौकी येथे सत्कार
निटूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य आणि अहिल्यानगर जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धा 2024-25 शिर्डी येथे दिनांक 24 मार्च ते 25 मार्च 2025 दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या 19 वर्षाखालील खेळाडूंनी उज्ज्वल कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
निलंगा तालुक्यातील निटूर येथील छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. रजत पदक - शिवकन्या सूर्यवंशी, कास्य पदक - जनाई सोनटक्के, प्रतीक्षा राठोड, सरस्वती पवार, सोनाक्षी बसवणे, स्वाती सोलंकर, पायल शिंदे, नम्रता मोरे, अमीन शेख, अनिस शेख सहभाग - पायल चव्हाण यांनी यश संपादन केले. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक के. वाय. पटवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशस्वी कामगिरीचा गौरव करण्यासाठी निटूर पोलीस चौकी येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस जमादार जी. डी. घाडगे व छत्रपती शाहू विद्यालयाचे प्राचार्य सोमवंशी पाटील यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक के. वाय. पटवेकर यांचा पेढा भरवून सत्कार केला. कार्यक्रमास उपसरपंच शिवराज सोमवंशी, पत्रकार सचिन अंकुलगे, प्रा. विष्णुदास इंगलवाड, धनंजय कनशेट्टे, सिद्धेश्वर सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments