यशवंतराव चव्हाण संकुल येथील सील झालेले गाळे खुले; प्रशासनाच्या निर्णयाचे व्यापाऱ्यांकडून स्वागत
महसूल विभागाच्या या कारवाईने येथील गाळेधारकात प्रचंड रोष निर्माण झाला होता. कालपासूनच हे सील प्रशासनाने काढावे यासाठीचे प्रयत्न व्यापारी तसेच माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात येत होते. आमदार अमित देशमुख, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, तहसिलदार सौदागर तांदळे, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, मनपा उपायुक्त पंजाबराव खानसोळे पाटील यांच्याकडे माझं लातूर परिवाराच्या वतीने यासंदर्भात त्वरीत निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाने संकुलातील सर्व सील केलेले गाळे आज मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता खुले केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे संकुलातील सर्व व्यापारी आणि माझं लातूर परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.
0 Comments