Latest News

6/recent/ticker-posts

के. वाय. पटवेकर यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी नियुक्ती

के. वाय. पटवेकर यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी नियुक्ती

लातूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागाच्या सहसचिवपदी निलंगा तालुक्यातील निटूर येथील  श्री. के. वाय. पटवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यरत राहील.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी ही घोषणा केली असून, डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांसाठी कार्य करण्याच्या त्यांच्या अनुभव व योगदानाचा विचार करून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. श्री. पटवेकर हे डिजिटल माध्यमाच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कार्यरत आहेत आणि पत्रकारितेच्या उच्च मूल्यांची जोपासना करत आहेत.

या नियुक्तीनंतर श्री. पटवेकर यांच्यावर विविध जबाबदाऱ्या येणार असून, डिजिटल मीडिया क्षेत्रातील हित जोपासण्यासाठी आणि पत्रकारांसाठी कार्य करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर, दीपरत्न निलंगेकर, सर्फराज(बाबा) मणियार, सतीश तांदळे, लिंबराज पन्हाळकर, नेताजी जाधव, किरण कुलकर्णी, उमेश कांबळे, संजय स्वामी, सुरेंद्र, विक्रम गायकवाड, विजयकुमार देशमुख, मुस्तफा सय्यद, राजकुमार भंडारी, राजकुमार सोनी यांच्यासह पत्रकार मित्रपरिवार व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments