Latest News

6/recent/ticker-posts

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळेगाव येथील कराटे खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळेगाव येथील कराटे खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा


अहमदपूर : तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये अशिहारा कराटे असोसिएशन, लातूरच्या वतीने कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत स्टेवणी गोमंगो, क्रांती कसनाळे, दत्ता फड, ऋषिकेश कसनाळे, श्रीकर शिंदे, सैफोद्दीन शेख यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून पदके मिळवली. तसेच कृष्णा मोरे, अनस देशमुख यांच्यासह एकूण ४७ कराटे प्रशिक्षणार्थींनी यश संपादन केले.

उत्तीर्ण कराटेपटूंना अशिहारा कराटे इंडियाचे अधिकृत प्रमाणपत्र व बेल्ट प्रदान करण्यात आले. मुख्य परीक्षक म्हणून के. वाय. पटवेकर यांनी भूमिका पार पाडली, तर क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मार्शल आर्ट कोच विक्रम गायकवाड यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू मद्देवाड, शाळेच्या प्राचार्या जेबा बेरला नादार, संगमेश्वर ढगे, राहुल अडसूळ, इस्माईल शेख तसेच पालक - मदन शिंदे, राहुल कासले, इंद्रजीत धडे यांच्यासह मित्र परिवाराने अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments