लातूर : किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या भिकाऱ्याला काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
लातूर : 13 ते 14 मार्च रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीने चहाटपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खुनाचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून तात्काळ तपासाची सूत्रे हलविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने काही तासातच अनोळखी मयताची ओळख पटवून तसेच गोपनीय व तांत्रिक माहितीच्याआधारे चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड मारून खून केलेल्या आरोपीला क्रीडासंकुलच्या गेट समोरून 14 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेरबंद केले असून नमूद आरोपीचे नाव देविदास शेषेराव सोनकांबळे, वय 54 वर्ष, राहणार खाडगाव रोड, प्रकाश नगर, चंद्रोदय कॉलनी, रोड क्रमांक 5, लातूर. असे असून सांगून तो दिवसभर भिक्षा मागून खातो. दुपारी तंबाखू घेण्या देण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरून नमूद मध्यरात्री चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेला इसम नामे प्रकाश लिंबाजी भडके, वय 58 वर्ष, खाडगाव रोड, लातूर. याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे कबूल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच दिवसभर भिक्षा मागून खाणाऱ्या व किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या नमूद आरोपीला काही तासातच जेरबंद केले असून पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, विनोद चलवाड, सचिन मुंढे यांनी केली आहे. असे आज प्रसिद्धीत देण्यात आलेल्या मजकुरात पोलिसांकडून सांगण्यात आले.
0 Comments