फीट इंडिया अंतर्गत २ मार्च रोजी 'संडे ऑन सायकल' उपक्रम
लातूर : (जिमाका) दि. - २८ केंद्र सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाद्वारे खेलो इंडीया योजनेच्या फीट इंडीया उपक्रमांतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत २ मार्च २०२५ रोजी 'संडे ऑन सायकल' उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दैनंदिन दिनचर्येत फिटनेसचा समावेश करण्याच्या उद्देशाने, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लठ्ठपणाशी लढण्यासाठी, आपल्या तंदुरुस्तीसाठी संतुलित शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. निरोगी राष्ट्राच्या उभारणीत नियमित शारीरिक व्यायाम आणि खेळांचे महत्व जनतेला पटवून देण्यासाठी 'संडे ऑन सायकल' ही मोहिम देशभरात २ मार्च २०२५ रोजी राबविण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने २ मार्च २०२५ रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी, नागरिक, विविध सायकलिंग क्लब, शाळा व महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थी व खेळाडू. यांनी 'संडे ऑन सायकल' या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व खेळाडू , क्रीडाप्रेमी, नागरिक यांनी आपली नोंदणी https://fitindia.gov.in/cyclothon-2024 वर नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
0 Comments