Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथील महाराष्ट्र विद्यालय कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची जयंती साजरी

निटूर येथील महाराष्ट्र विद्यालय कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची जयंती साजरी


निटूर : दि. 9 फेब्रुवारी 2025 – महाराष्ट्र विद्यालय, निटूर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांचे योगदान आणि समाजकार्यातील भूमिका याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाला सोसायटीचे व्हा. चेअरमन दिनकर (नाना) निटुरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, पत्रकार के वाय पटवेकर, राजकुमार सोनी, ज्ञानेश्वर पिंड, राजू निटुरे, अनिल देशमुख, तसेच कोळेकर यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी डॉ. निलंगेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि त्यांनी शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारावर भाष्य केले. राजू सोनी आणि दिनकर (नाना) निटुरे यांनी त्यांच्या समाजकार्यातील भूमिका आणि सार्वजनिक जीवनातील आदर्श विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. एन. भोयबार यांनी केले.

Post a Comment

0 Comments