लोकनायक संघटनेचा मनपावर ठिय्या – वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी
लातूर : लोकनायक संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या शेजारील जागा वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी राखीव ठेवावी आणि गंजगोलाईतील भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करावे, या मागण्यांसाठी 17 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेने यापूर्वीही या मागण्यांसाठी निवेदने दिली असून, उपोषण आंदोलनही केले आहे. तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी 5 कोटी रुपयांचे आश्वासन दिले होते. मात्र, पालकमंत्रीपद संपल्यानंतर आमदार अमित देशमुख यांना देखील निवेदन देण्यात आले. सततच्या आंदोलने व उपोषणानंतरही महापालिकेने मागणी गांभीर्याने घेतलेली नाही. मनपाने सदर जागेवरील वाहनतळ हटवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी 10 कोटी रुपये मंजूर करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
हा मोर्चा लोकनायक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महादूभाऊ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव बंटी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते जे. गायकवाड, प्रीती माऊली लातूरकर, नानासाहेब उपाडे, अमर शिंदे, अश्विन कांबळे, अतिश पाटोळे, पुरुषोत्तम चाटे, सुरेखा गवळी, उर्मिला नवगिरे, साक्षीताई लातूरकर, पपीता रणदिवे, दगडू उदार, अमित शिंदे, बिभीषण मस्के, चंद्रकांत पाटील, सुनील पात्रे, निलेश गायकवाड, बबलू शिरसाठ, पवन पौळ, इस्माईल सय्यद, विशाल रसाळ, अमोल भालेकर, मुकेश कुंटणकर, नरसिंग काळदाते, बालाजी रसाळ, धनराज कांबळे, आकाश माने, प्रमोद जोगदंड यांच्यासह मातंग समाजातील महिला व भाजी विक्रेत्यांनी सहभाग घेतला.
0 Comments