Latest News

6/recent/ticker-posts

'म्युझिकल नाईट विथ गौतमी पाटील' आणि खानदेशातील लोकप्रिय कलाकारांचा जल्लोष

जळगावमध्ये संगीत आणि नृत्याचा भव्य सोहळा!

'म्युझिकल नाईट विथ गौतमी पाटील' आणि खानदेशातील लोकप्रिय कलाकारांचा जल्लोष

जळगाव: खानदेशातील संगीत आणि मनोरंजनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘म्युझिकल नाईट विथ गौतमी पाटील’ हा भव्य संगीत व नृत्य महोत्सव लवकरच आपल्या शहरात सज्ज होणार आहे. सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या आकर्षक आणि दमदार नृत्यसादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. हा शानदार सोहळा बी. आनंदकुमार आणि ललित विकास चौधरी यांच्या विशेष प्रयत्नांतून आयोजित करण्यात आला आहे. या संगीतमय आणि नृत्यमय रात्रीत खानदेशातील लोकप्रिय कलाकार देखील आपली कला सादर करणार आहेत.

विशेष आकर्षण: गौतमी पाटील – आपल्या भन्नाट लयबद्ध नृत्यासह सुप्रसिद्ध खानदेशी कलाकार – सचिन कुमावत, विनोद कुमावत आणि त्यांचे सहकारी लोकप्रिय अहिराणी गीतकार व गायक – भय्या मोरे, सुमधुर गायिका – मेघा मुसळे दिनांक: २ मार्च २०२५, रविवार वेळ: संध्याकाळी ६:०० वाजता स्थळ: शुभम लॉन्स, सुवर्णनगरी, जळगाव अधिक माहितीसाठी संपर्क: 98507 72244 , 8625078770 जळगावकरांनी हा संगीतमय जल्लोष अनुभवण्यासाठी तयार राहावे.

Post a Comment

0 Comments