पल्लवी जाधव यांची लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश
निलंगा : लक्ष्य करिअर अकॅडमी - स्पर्धा परीक्षा केंद्र, निलंगा येथील विद्यार्थिनी पल्लवी बालाजी जाधव यांनी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत महसूल सहाय्यक/क्लार्क पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या अथक मेहनतीला आणि चिकाटीला मिळालेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अकॅडमीचे संचालक राम राठोड, विठ्ठल चांबरगे, ज्योती राठोड यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशाने अकॅडमीच्या गुणवत्तेची परंपरा अधिक दृढ झाली आहे.
0 Comments