अंगणवाडी सेविका पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर : दि. 11 - बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना लातूर ग्रामीण योजनेतंर्गत लातूर तालुक्यातील दगडवाडी व रमजानपूर येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका तसेच हरंगुळ बु. येथील तीन, महाराणा प्रतापनगर, नांदगाव येथील दोन गंगापूर, वासनगाव, अंकोली, 12 नंबर पाटी (शामनगर), सिकंदरपूर, साखरा, मांजरी, हरंगुळ खु., मुरुड अकोला, वरवंटी, चिखलठाणा, सोनवती, मळवटी, उमरगा, सलगरा बु. , बोकनगाव, कातपूर, बाभळगाव, सिरसी, कव्हा अंगणवाडीतील प्रत्येकी एक मदतनीसांची पद भरण्यात येणार आहे. यासाठी गावातील स्थानिक रहिवाशी असलेल्या पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदांसाठी 2 फेब्रुवारी, 2023 व 30 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार महिला उमेदवार भरण्यात येणार असून महिला बारावी उत्तीर्ण असावी. अर्ज करण्यसास इच्छूक असलेल्या महिला उमेदवारांनी माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाशी 11 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच कार्यालयात अर्ज स्विकारले जाणार आहेत, असे लातूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
0 Comments