Latest News

6/recent/ticker-posts

तायक्वांदो कलर बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत केशवराज विद्यालयाच्या श्रीगणेशला सुवर्णपदक

तायक्वांदो कलर बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत केशवराज विद्यालयाच्या श्रीगणेशला सुवर्णपदक

लातूर : दि 09 फेब्रुवारी तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर या अधिकृत संघटनेअंतर्गत आज श्री केशवराज विद्यालय शाम नगर लातूर येथे कलर बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेत केशवराज विद्यालयाचा श्री गणेश खडबडे याला ए प्लस ग्रेड सुवर्णपदक प्राप्त झाले असून तो या ग्रेडेशन मधला उत्कृष्ट परीक्षार्थी ठरला आहे तर नमन पारिक, सृष्टी कांबळे, स्वराली देशपांडे व श्रुतिका झिपरे याही ए प्लस ग्रेडने पास झाले आहेत. असे कुकिऑन साउथ कोरिया परिक्षक तथा आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक नेताजी जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

लातूर जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूसाठी आज श्री केशवराज विद्यालय वंदे मातरम सभागृहात कलर बेल्ट ग्रिटेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रेडेशन साठी 57 तायक्वांदो खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता तायक्वांदो हा खेळ प्रकार विदेशी खेळ प्रकार असून हा मार्शल आर्ट प्रकारामध्ये मोडतो या खेळाने खेळाडूचे मन मनगट आणि मेंदू मजबूत होते असेही यावेळी सांगण्यात आले आहे तर या परीक्षेत ए ग्रेड ने पास झालेले तेज पारीक, आर्यन नागटिळक, आशुतोष कांबळे, सृष्टी भुतडा, जानवी यादव, देवांशी हंडीबाग, श्रद्धा मोरे, आरोही राऊतराव, तपस्वी परिहार, समर्थ जाधव, श्रीराम मोरे, तेजश्री देशमुख, पूजा जाधव व अहिल पठाण यांचेही कौतुक केले जात आहे.

या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे मुख्य परीक्षक नेताजी जाधव, परीक्षक धनश्री मदने, एस व्ही कुलकर्णी, जानवी मदने, विवांशी अंदुरे व विराज देशमुख यांनी काम पाहिले आहे.

Post a Comment

0 Comments