Latest News

6/recent/ticker-posts

तिसरी खुली मुंबई विभागीय ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिप उत्साहात संपन्न

तिसरी खुली मुंबई विभागीय ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिप उत्साहात संपन्न


बोरीवली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ सबर्बन डिस्ट्रिक्ट आणि बोरीवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी खुली मुंबई विभागीय ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिप 2025-26 उत्साहात संपन्न झाली. ही स्पर्धा मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, महावीर नगर, बोरीवली (पश्चिम) येथे पार पडली. ही स्पर्धा स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष सी. ए. तांबोली आणि ओमरमुख्तार तांबोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ सबर्बन डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष आणि मुंबई विभागाचे सचिव आशुतोष पांडे, सचिव सुमित मिस्री, खजिनदार राहुल भोसले तसेच पार्थ स्पोर्ट्स इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक वरुण श्रीकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

मुंबई विभागातील खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग आणि पॅनक्रेशन या प्रकारांमध्ये २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेला ठाकूर विद्या मंदिर हायस्कूल आणि पावर पंच किकबॉक्सिंगचे कोच अमित पांडे, चीता मार्शल आर्ट्सचे कोच रोहित भंडारी, शिवनेरी मार्शल आर्ट्सचे कोच नितीन वाडेकर, न्यू कुंग फू-वुशु मार्शल आर्ट्सचे कोच खेमराज पैंटोला, ठाकूर कॉलेजचे सहायक कोच आदित्य मिश्रा आदी प्रशिक्षक उपस्थित होते.

या स्पर्धेला बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांची विशेष उपस्थिती होती. तसेच ठाकूर कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ. एम. के. अली रिजवी, स्पोर्ट्स सेवर संस्थेच्या संस्थापक पालोमी कुंडू, अथर्व कॉलेज क्रीडा व्यवस्थापन प्रमुख सिद्धेश्वर शिंदे, चेस बॉक्सिंग महाराष्ट्रचे सचिव अधिवक्ता राज निषाद, ऑल मुंबई सबर्बन वुशु असोसिएशनचे सचिव दिनेश माली, चंद्रभान शर्मा कॉलेजचे क्रीडा संचालक विजय पंढारे, फिटनेस प्लेनेट इन्स्टिट्यूटच्या मनीषा राजन आणि दीपक माली, श्री संकल्प सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा रुपा पांडे, मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विशाल सिंह, महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार विजेती पूजा पांडे आणि स्पार्टन फिटनेस क्लबचे संस्थापक सौरभ पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी बोरीवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनचे संस्थापक आणि माजी आमदार सुनिल राणे यांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ सबर्बन डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष आणि मुंबई विभागाचे सचिव आशुतोष पांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

0 Comments