Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथे महाराष्ट्र विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

निटूर येथे महाराष्ट्र विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


निटूर : येथील महाराष्ट्र विद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी श्रीनिवास मोरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र निळकंठराव धुमाळ, तसेच "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे मालक आणि संपादक के. वाय. पटवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एस. एन. राऊत, आर. एस. सावळकर, सिद्धेश्वर बाडगंडे, उमाकांत लांडगे, मनोज कांबळे, अंकुश कवडे यांच्यासह कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.

महाराष्ट्र विद्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक धुमाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी विद्या युवराज सोमवंशी, शिवानी तुळजापूरे आणि श्रद्धा शिवराज सोमवंशी यांनी शिवचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांची महत्त्वपूर्ण शिकवण दिली. यावेळी पत्रकार के. वाय. पटवेकर, भोयबार, पाटील, अनिल देशमुख, राजू निटुरे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments