Latest News

6/recent/ticker-posts

सुशीलादेवी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

सुशीलादेवी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन


लातूर :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीलादेवी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे काल (रविवार) रोजी लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्या ८३ वर्षांच्या होत्या. स्व. सुशीलादेवी निलंगेकर यांच्या पार्थिवावर सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजता सिंदखेड येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, हितचिंतक आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्व. सुशीलादेवी निलंगेकर या प्रतिष्ठित कुटुंबातील असून, त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास कुटुंब व सामाजिक कार्यासाठी समर्पित होता. त्या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर आणि महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर यांच्या मातोश्री होत्या. तसेच, त्या माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू तसेच माजी मंत्री व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आजी होत्या. त्यांच्या जाण्याने निलंगेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. स्व. सुशीलादेवी निलंगेकर यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण लातूर व निलंगा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री, आमदार, खासदार तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. स्व. सुशीलादेवी निलंगेकर यांना "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments