Latest News

6/recent/ticker-posts

देवणी नगरपंचायतीच्या सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध

देवणी नगरपंचायतीच्या सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध


देवणी: (प्रतिनिधी - विक्रम गायकवाड) देवणी नगरपंचायतीच्या विविध समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या असून, या सर्व निवडी बिनविरोध झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी रेणुका रमेश कोतवाल, तर स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी शारदा अश्विन लांडगे यांची निवड करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी नदीम सलीम मिया मिर्झा, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी विमलताई विनायक बोरे यांची बिनविरोध निवड झाली.

याशिवाय, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्ष अमित मानकरी, तर स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्ष सौ. कीर्तीताई संजय घोरपडे यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके उपस्थित होते, तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी संतोष लोमटे आणि तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी भूमिका बजावली. निवडीनंतर नगरपंचायतीतर्फे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments