निटूर येथील महाराष्ट्र विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ
निटुर : येथील महाराष्ट्र विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ दिनांक 12 फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून शिवभक्त, शिवप्रेमी देवा चव्हाण उपस्थित होते. आपल्या भाषणातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र निळकंठराव धुमाळ होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवराय आणि कै. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जि. प. प्रा. शाळा, निटुर मोड येथील मुख्याध्यापक साबणे, जि. प. प्रा. शाळा, कलांडी येथील मुख्याध्यापक मलिशे, महाराष्ट्र विद्यालय, नेलवाड येथील शिक्षक जाधव, भोयबार, नाईकवाडे, नरसिंग पाटील, सूर्यवंशी, स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक श्रीजीत माणकोस्कर, उपमुख्याध्यापक सुप्रिया बुरकूले तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुनाक्षी कांबळे आणि कु. प्रतीक्षा शिंदे या विद्यार्थिनींनी केले.
0 Comments