Latest News

6/recent/ticker-posts

शिहान अजमीर बी. शेख यांना आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

शिहान अजमीर बी. शेख यांना आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक


लातूर : न्यू ड्रॅगन फायटर मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने सरूरनगर, इंडोर स्टेडियम, एल.बी. नगर, हैदराबाद (तेलंगाणा) येथे आयोजित चौथी इंटरनॅशनल ओपन कराटे व कुंग-फू चॅम्पियनशिप – 2025 या स्पर्धेत लातूरच्या इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष आणि कराटे प्रशिक्षक शिहान अजमीर बी. शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले.

या स्पर्धेत काता व कुमिते या दुहेरी खेळ प्रकारात 35 वर्षांवरील गटात त्यांनी सर्वोत्तम प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत श्रीलंका, भूतान आणि नेपाळ या देशांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. शिहान अजमीर बी. शेख यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पत्रकार के. वाय. पटवेकर, नेताजी जाधव, माजी नगरसेवक अयूब मणियार, सिने अभिनेते रवीकुमार शिंदे, नागेश जोगदंड आणि विजय गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments