Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथील विजयकुमार देशमुख यांना पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार

निटूर येथील विजयकुमार देशमुख यांना पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार

उदगीर : उदगीर येथील रंगकर्मी, साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार संघाच्या वतीने निटूर येथील पत्रकार विजयकुमार देशमुख यांना पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी या पुरस्कारांची घोषणा झाली होती.

हा पुरस्कार राज्याचे माजी क्रीडा मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध सिने-अभिनेत्री अदिती शारंगधर, अभिनेत्री उर्मिला डांगे, कवी प्रा. इंद्रजीत भालेराव, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी, ज्येष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके आणि पत्रकार विनोद उगिले यांच्या उपस्थितीत हा बहारदार सोहळा पार पडला. पुरस्कार मिळाल्याबद्दल विजयकुमार देशमुख यांचे पत्रकार मित्र व कुटुंबीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments