गोवा येथे नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप लो-किक प्रकारात नदीम तांबोळीचे उत्कृष्ट फाईट प्रदर्शन
पणजी : गोवा किकबॉक्सिंग असोसिएशन (जीकेए) द्वारा आयोजित नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 19 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान गोव्यातील पणजी येथील इनडोर स्टेडियम कॅम्पलमध्ये पार पडली. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील, सध्या पुणे येथे राहणारे मोहम्मदअली तांबोळी यांचे पुत्र नदीम मोहम्मदअली तांबोळी यांनी लो-किक फाईट प्रकारात सीनियर व 57 किलो वजन गटात अप्रतिम प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत विविध राज्यांतील तज्ञ खेळाडूंनी त्यांच्या उत्कृष्ट कौशल्याने आणि दमदार लढाईने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या चॅम्पियनशिपने किकबॉक्सिंग प्रेमींना एकत्र आणले आणि खेळाडूंनी शारीरिक क्षमता, रणनीती आणि धैर्य यांचा उत्तम मिलाफ दर्शविला.
नदीम तांबोळीने आपल्या प्रभावी प्रदर्शनाने स्पर्धेत एक ठसा कायम ठेवला. त्याच्या तंत्र, शारीरिक क्षमता आणि रणनीतीच्या आधारावर त्याने इतर खेळाडूंना मागे टाकत स्पर्धेतील सर्वोच्च स्थान पटकावले. या विजयामुळे त्याला भविष्यातील किकबॉक्सिंग चॅम्पियन म्हणून ओळख मिळवली आहे.
नदीम तांबोळी हे चुलत बंधू उमरकासिम तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. तसेच, त्याला त्याचे वडील आणि भाऊ यांच्या प्रशिक्षणाचा विशेष लाभ मिळाला आहे. नदीमच्या या यशाबद्दल स्पोर्ट केम्पो महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष अलीम तांबोळी, सचिव के. वाय. पटवेकर, संघवी केशरी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश पवार, विभाग प्रमुख प्रवीण जाविर, वर्ग शिक्षक- शाखापुरे, आदित्य बुक्की, अशपाक तांबोळी यांनी अभिनंदन केले आहे.
मार्शल आर्ट्सच्या वारशातून आलेल्या नदीमला लहानपणापासूनच त्याचे मोठे चुलते सेवानिवृत्त सैन्य दलातील अधिकारी सी. ए. तांबोळी, वडील व भाऊ यांच्याकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षण मिळाले आहे. या प्रशिक्षणामुळे त्याला किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवता आले.
नदीम तांबोळी हे संघवी केशरी आर्ट्स, कॉमर्स & सायन्स कॉलेज, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत.
किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नदीम तांबोळी यांनी लो किक, -57 किलो सीनियर पुरुष गटात उत्कृष्ट खेळ करत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. त्यांच्या दमदार खेळामुळे त्यांची आगामी किकबॉक्सिंग वर्ल्डकप 2025 साठी निवड झाली असून, ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब ठरली आहे.
0 Comments