Latest News

6/recent/ticker-posts

लातूर विभागीय शालेय ट्रॅडिशनल (बेल्ट व मास) रेसलिंग स्पर्धा उत्साहात

लातूर विभागीय शालेय ट्रॅडिशनल (बेल्ट व मास) रेसलिंग स्पर्धा उत्साहात


लातूर : जिल्ह्यातील क्रीडा संकुलात 6 जानेवारी रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि लातूर शहर व जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर विभाग स्तरीय शालेय ट्रॅडिशनल (बेल्ट व मास) रेसलिंग क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साह आणि खेळीमळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धेतील मुख्य लढती नांदेड आणि लातूर जिल्ह्यात झाल्या, स्पर्धेचे उद्घाटन सागर बोधे ( CS कंपनी सेक्रेटरी ) यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

उद्घाटन वेळी बोधे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत लातूर विभागाने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदक मिळवावीत, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून PATM फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज (बाबा) मणियार उपस्थित होते. सरफराज मणियार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे केवळ शारीरिक क्षमता वाढत नाही, तर एकजुटीचे, सहकार्याचे आणि समर्पणाचे महत्त्वही शिकता येते.

स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड आणि रेसलिंग कोच चेतन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच, तज्ञ पंचांच्या निरीक्षणाखाली स्पर्धा पार पडल्या. मास रेसलिंग आणि बेल्ट रेसलिंग या दोन प्रकारांत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. नांदेड जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनचे सचिव आणि राष्ट्रीय पंच बालाजी गाडेकर, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक तथा लातूर शहर व जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष खय्युम तांबोळी, राष्ट्रीय खेळाडू के वाय पटवेकर यांनी सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच, राष्ट्रीय पंच सलोनी सुरदशे, राज्यस्तरीय पंच वैष्णवी एनगे, अश्विनी चव्हाण, आणि राष्ट्रीय खेळाडू विश्वजीत येणकुरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

स्पर्धेच्या समारोप वेळी विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समर्पणावर आधारित राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत अधिकाधिक पदक मिळवण्यासाठी प्रेरित केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम बोडके आणि विष्णुदास इंगलवाड यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन के. वाय. पटवेकर यांनी केले. या स्पर्धेदरम्यान धाराशिव जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनचे चे राहुल अंबुरे, नांदेड जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनचे सहसचिव नितीन देडे, प्रा. विष्णुदास इंगळवाड, कराटे प्रशिक्षक बालाजी राजमाने यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक, पालक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments