डॉ. दिपक गुगळे यांची आयएमए महाराष्ट्र हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया उपाध्यक्षपदी निवड
लातूर : येथील सुप्रसिद्ध पोटविकार तज्ञ तथा गुगळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिपक गुगळे यांची महाराष्ट्र राज्य आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई येथे पार पडलेल्या परिषदेमध्ये आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी सर्वानुमते नियुक्ती केल्याची घोषणा केली.
डॉ. गुगळे यांच्या आयएमए मधील कार्याची तसेच अनुभवाची दखल घेत विशेष बाब म्हणून ही निवड करण्यात आली आहे. आयएमए मध्ये अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली आहे. हे महत्वाचे पद भुषविणारे लातूर जिल्ह्यातील ते पहिले डॉक्टर आहेत. आगामी काळात राज्यातील हॉस्पिटल विषयक समस्या समजावून घेण्यासाठी राज्यस्तरीय परिषद घेण्याचा मानस डॉ. दिपक गुगळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. ते माझं लातूर या सामाजिक परिवाराचे मार्गदर्शक सदस्य आहेत. राज्य आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष कदम, मनोनीत अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, सचिव अनिल आव्हाड (मुंबई), डॉ. सौरभ सनजनवाला (मुंबई), डॉ. संजय कदम (नांदेड), डॉ. सुनील इंगळे (पुणे), डॉ. अनिल पाटील (जळगाव), डॉ. यशवंत गाडे (छत्रपती संभाजीनगर)
यांच्यासह खासदार. डॉ.शिवाजी काळगे, डॉ. कुकडे काका, डॉ.भराडिया, डॉ. बाहेती, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. उदय मोहीते पाटील, डॉ. जमादार, डॉ. चिंते, डॉ. जटाळ, डॉ. संतोष कवठाळे, डॉ. गिरीश मैदरकर, डॉ. अशोक पोद्दार, डॉ संजय वारद, डॉ. उमेश कानडे, मनोनीत अध्यक्ष डॉ. अभय कदम, डॉ. संदीप कवठाळे, डॉ. राजेश एनाडले तसेच माझं लातूर परिवाराच्या वतीने डॉ. दिपक गुगळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments