पञकार नेताजी जाधव यांना व्हॉइस ऑफ मेडिया यांच्याकडून डिजिटल मेडिया युवा पुरस्कार प्रदान
लातूर : दिनांक 6 जानेवारी आद्य मराठी पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त आज दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता भालचंद्र ब्लड बँक सभागृह येथे व्हॉइस ऑफ मेडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित डिजिटल मीडियात उत्कृष्ट काम करणाऱ्या युवा पत्रकारांना युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी लातूर नेता न्यूज चैनल मुख्य संपादक नेताजी जाधव यांचा डिजिटल क्षेत्रातील न्यूज ची दखल घेत युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हा सन्मान जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, डिजिटल विभागाचे जिल्हाध्यक्ष सितम सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी व्हाईस ऑफ मेडियाचे शहाजी पवार, अभय मिरजकर, राघवेंद्र देबटवार, सचिन चांडक, योगीराज पिसाळ, अनिल पुरी, हमीद शेख, विनोद चव्हाण, शिरीष कुमार शेरखाने, मधुकर चलमाले, खंडेराव देडे, राम रोडगे, प्रभाकर शिरुरे, अशोक कुलकर्णी, दिलीप मुनाळे, सुभाष सगर, आनंद माने, गजानन ढगे, काकासाहेब घुंटे, संतोष खंडेलवाल, माऊली परांडे, संतोष सोनवणे, प्रकाश कंकाळ, साईनाथ घोणे, धनराज वाघमारे आदी दैनिक वृत्तपञ साप्ताहिक व डिजिटल मेडिया प्रमुख व संपादक उपस्थित होते.
0 Comments