Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लातूरच्या कृष्णा पोतदारची निवड

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लातूरच्या कृष्णा पोतदारची निवड


लातूर : महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचा उत्कृष्ठ खेळाडू तथा लातूर रेल्वे दलातील तिकीट कलेक्टर कृष्णा नागनाथ पोतदार याची जयपूर येथे ७ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

लातूरचे दोघे एकाच स्पर्धेत...

जयपूर येथे होणाऱ्या या स्पर्धेत लातूरच्या दोघांचा सहभाग राहणार असून पहिल्यांदाच ही किमया झाली असून प्रल्हाद सोमवंशी व कृष्णा पोतदार हे लातूरच्या महाराष्ट्र क्लबचे खेळाडू एकत्रित राष्ट्रीय स्पर्धेत लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


पुण्यातील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून कृष्णाची महाराष्ट्र संघात युनिव्हर्सल म्हणून निवड झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर सुरू असून कृष्णाला एन.आय.एस प्रशिक्षक महेश पाळणे, विजय सोनवणे, रेल्वे प्रशिक्षक अमेय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कृष्णाने यापूर्वी विविध वयोगटातील नऊ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून  आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यासह सेंट्रल रेल्वेकडून खेळताना त्याने अनेकवेळा चमकदार खेळ केला आहे. या यशाचे कौतुक लातूर विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मोईज शेख,विद्यापीठ क्रीडा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ,कैलास पाळणे,विभागीय सचिव दत्ताभाऊ सोमवंशी,क्रीडा अधिकारी दत्तात्रय गडपल्लेवार, रामदास नाडे,फाजील शेख,ललित जोशी,पवन पाळणे,प्रवीण तावशीकर,नंदू भोसले,विश्वजीत कासले, डॉ.निलेश पौळ, विठ्ठल कवरे, नागेश जोगदंड,महेश शिंदे, संजय देशमुख,गणेश कोल्हे,सद्दाम शेख,दत्ता धाकपाडे,नानासाहेब देशमुख,माधव रासुरे,रोहित राजपूत यांच्यासह महाराष्ट्र क्लबच्या सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments