Latest News

6/recent/ticker-posts

धनेगाव येथील श्री महादेव अ‍ॅग्रो फूड्सच्या शुद्ध सेंद्रिय गुळाचा आस्वाद

धनेगाव येथील श्री महादेव अ‍ॅग्रो फूड्सच्या शुद्ध सेंद्रिय गुळाचा आस्वाद


धनेगाव : श्री महादेव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, धनेगावचे मुख्याध्यापक रामलिंग मुळे, प्रा. डॉ. मस्तापुरे जी. एस., शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह धनेगावचे माजी सरपंच कुमार पाटील यांच्या छत्रपती फार्म (शेतामध्ये) उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात कुमार पाटील यांनी तयार केलेल्या श्री महादेव अ‍ॅग्रो फूड्सच्या शुद्ध सेंद्रिय गुळाचा आस्वाद सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिला.

गुळ उत्पादनासाठी पारंपारिक आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर करणाऱ्या कुमार पाटील यांच्या गुळाच्या स्वादाची उपस्थितांनी प्रशंसा केली. विद्यालयाच्या समूहाने निसर्गाच्या सानिध्यात गुळाचा आस्वाद घेतला. कुमार पाटील यांनी सर्व उपस्थित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना श्री महादेव अ‍ॅग्रो फूड्स निर्मित शुद्ध सेंद्रिय गुळाचे प्रत्येकी एक डब्बा भेट म्हणून दिले.

या उपक्रमात "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे संपादक के. वाय. पटवेकर, श्री अनंत तुळजाराम नाईक विद्यालयाचे रामदास बिराजदार, श्री महादेव मा. उच्च मा. विद्यालयातील पूर्ण कर्मचाऱ्यांचा समूह, कुमार पाटील यांचे कामगार कर्मचार्‍यांसह काही विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी या सेंद्रिय गुळाचा आस्वाद घेत निसर्गाशी जडलेली शुद्धता अनुभवली. कुमार पाटील यांच्या या उपक्रमाने शुद्ध सेंद्रिय उत्पादनांच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित केले असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments