क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
कासार सिरसी :( प्रतिनिधी/फिरोज जागीरदार ) दि. ३ - येथील जिल्हापरिषद कन्या शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी सावित्री माई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकत, आपल्या मनोगतातून त्यांचे महान योगदान व्यक्त केले.
मुख्याध्यापिका होळकुंदे मॅम यांनी विद्यार्थ्यांना सावित्री माई फुले यांच्या जीवनकार्याचे महत्व समजावून सांगत, त्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या योगदानामुळे महिलांसाठी शिक्षणाच्या दारे खुली झाली असून, समाजातील प्रत्येक घटकासाठी समानतेची परंपरा निर्माण झाली, यावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments