गंजगोलाईत मुस्लिम विकास परिषदेचा पे अँड पार्क व टेंडर वसुलीविरोधात निषेध
लातूर : शहरातील गंजगोलाईत मुस्लिम विकास परिषदेने 28 जानेवारी रोजी पे अँड पार्क आणि टेंडर वसुलीच्या विरोधात निषेध व्यक्त केला. महापालिकेने पथविक्रेते आणि हातगाडे व्यवसायिकांना संक्रात आणण्याचा निर्णय घेतल्याने या व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुस्लिम विकास परिषदेने गंजगोलाईत दुपारी 12:00 वाजता आंदोलन करत टेंडर वसुलीच्या प्रतीचे दहन केले.
मुस्लिम विकास परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आणि महापालिकेच्या धोरणाच्या विरोधात आपला आवाज उठवला. त्यांचा आरोप आहे की, पथविक्रेते आणि हातगाडे व्यवसायिकांच्या उपजीविकेवर संकट आले आहे आणि नवीन वसुली पद्धतीने त्यांना अधिक त्रास होईल. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कारवाईचे तीव्र विरोध करत, या पद्धतीला त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. हे आंदोलन महापालिका प्रशासनाला जागरूक करणे आणि पथविक्रेते तसेच हातगाडे व्यवसायिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केले गेले आहे. अशी माहिती स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे प्रमुख मोहसीन खान यांनी दिली.
0 Comments