नांदेडमध्ये राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा प्रशिक्षण निवासी शिबिराचे आयोजन
नांदेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड येथे राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा प्रशिक्षण निवासी राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १३ जानेवारी २०२५ पीपल्स कॉलेज मैदान, नांदेड येथे शिबिराच्या पुढील राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा १४ ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत पीपल्स कॉलेज मैदान व सायन्स कॉलेज मैदान नांदेड येथे आयोजित केल्या जातील.
शिबिराच्या आयोजनात जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी सर्व ऑफिशियल पंच आणि टीम कोचेस प्रशिक्षित करत आहेत. नांदेड जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे जिल्हा सचिव आनंदा कांबळे हे सध्या महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण घेत आहेत. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सर्व राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू, पंच, अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. असे प्रसिद्ध देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments