Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले  यांची जयंती साजरी

निटुर : दि. ३ - येथील महाराष्ट्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना आपल्या मनोगतातून त्यांचे योगदान व्यक्त केले. मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना सावित्री माई फुले यांच्या जीवनकार्याचे महत्व सांगून सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात पालक उत्तमराव भोयबार, विद्यालयाचे सर्व शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षिकेने विद्यार्थ्यांना समाजातील असमानतेविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्व सांगितले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांनी सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजलि अर्पण करून केली.

Post a Comment

0 Comments