गोव्यात राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन; 600 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग
पणजी : गोवा किकबॉक्सिंग एसोसिएशन (जीकेए) द्वारा आयोजित राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न होत असून या स्पर्धा 19 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान पणजी येथील इनडोर स्टेडियम कॅम्पलमध्ये होत आहेत. काल स्पर्धेचा तिसरा दिवस होता गोव्याचे प्रसिद्ध उद्योगपती असिफ अब्बास अहमद सह गोवा व महाराष्ट्र राज्यातील मान्यवराने या स्पर्धेला भेटी दिल्या. नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशन (वाको इंडिया) चे संस्थापक प्रमुख सी. ए. तांबोळी आणि कार्यवाह अध्यक्ष बापूसाहेब घुले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडत आहेत. सामनाचे अधिकारी म्हणून जयदेव म्हमाणे आणि संतोष खैरनार काम पाहत आहेत.
या स्पर्धेत केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडीसा, वेस्ट बंगाल, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा आणि हरियाणा राज्यातील विशेष सैन्य दलातील जवान सहभागी झाले आहेत. हे जवान के-वन आणि फुल कॉन्टॅक्ट या फाइट प्रकारांमध्ये स्पर्धेत भाग घेत आहेत. या स्पर्धेमध्ये देशभरातून 600 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धा चार बाऊट्समध्ये होत असून पंच म्हणून सचिद लेसन, महेश चाचर, प्रवीण चव्हाण, समशेर अहमद, विनोद शिंदे, विक्रम गायकवाड, विश्वजीत येणकुरे, आयशा बेगम, यास्मिन सुलतान, क्रिस्टेनदू यांच्यासह इतर प्रशिक्षित पंच काम पाहत आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चंद्रशेखर सालकर, बाबुराव नाईक, शुभम ठुबे, संदीप पेडेकर, मोहम्मद अली तांबोळी, आदित्य बुक्की, अशपाक तांबोळी, नितीन मुळे, नदीम तांबोळी, मिलिंद श्रीराम आणि गोवा किकबॉक्सिंग एसोसिएशनचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
0 Comments