राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मुंबई शहर किकबॉक्सिंग असोसिएशनची उत्कृष्ट कामगिरी – 33 सुवर्ण, 9 रौप्य, 7 कांस्य पदके जिंकले
मुंबई : गोवा किकबॉक्सिंग असोसिएशन (GKA) द्वारा 19 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान पणजी येथील इनडोर स्टेडियम कॅम्पलमध्ये आयोजित राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विविध राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते. केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडीसा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा आणि हरियाणा येथील किकबॉक्सिंगपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेत महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर संघाने शानदार कामगिरी करत 33 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्य पदके जिंकली. या यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. याचबरोबर, मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशनचे दिगंबर आवले आणि कल्पेश निर्गुलकर यांची राष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना कामगार कल्याण आयुक्त रविराज इवले, कामगार कल्याण उप आयुक्त श्रीकांत धोत्रे आणि शिवसेना शाखा प्रमुख गोपाळ खाडे यांनी अभिनंदन केले. तसेच, खेळाडूंना त्यांच्या कष्टाचे आणि मेहनतीचे फळ मिळाल्याबद्दल मित्रपरिवार आणि इतर सहाय्यक मंडळांनी त्यांना कौतुकाचे शब्द दिले.
0 Comments